बुलडाणा - अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर आज बुधवारी सकाळी बुलडाणा जिल्ह्यातून वाहणाऱ्या पुर्णा नदीला पूर आला आहे. दरम्यान, सदर पुलावरुन चार ते पाच फूट पाणी वाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद–नांदुरा मार्ग आज सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुर्णा नदीच्या पुलावर पाच फूट पाणी, नांदुरा-जळगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद - Nandura-Jalgaon road closed for traffic
अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर आज बुधवारी सकाळी बुलडाणा जिल्ह्यातून वाहणाऱ्या पुर्णा नदीला पूर आला आहे. दरम्यान, सदर पुलावरुन चार ते पाच फूट पाणी वाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद–नांदुरा मार्ग आज सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे
गेल्या दोन-तीन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर, काही भागांत ढगफुटी झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, पुर्णा नदीच्या उगमस्थानावरही पावसाची संततधार सुरू आहे. लहान मोठी धरणेही पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या नदीपात्रात पाण्याची मोठी वाढ होत असून, पुलावरून सध्या चार ते पाच फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे.