महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

HSC Maths Paper Leak : बारावीच्या गणित पेपर फुटीप्रकरणी पोलिसांना मोठे यश; दोन शिक्षकांसह पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात 3 मार्च रोजी इयत्ता बारावी परीक्षेच्या पेपर फुटीची घटना घडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने परीक्षा घेण्यात येत आहे. गणित विषयाचा पेपर परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना आहे.

paper leak
पेपर फूटप्रकरणी पोलिसांना मोठे यश

By

Published : Mar 5, 2023, 1:26 PM IST

पेपर फूटप्रकरणी पोलिसांना मोठे यश

बुलडाणा : या संपूर्ण पेपर फुटीचे पडसाद सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अधिवेशनात देखील उमटत आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अधिवेशनात सभागृहामध्ये या पेपर फूट प्रकरणाचे फोटो अधिवेशनात दाखवले. त्यानंतर राज्य सरकारला धारेवर धरत या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर राज्य सरकार खळबळून जागे झाले. त्या दिवशी सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग केले आहे.

उच्च माध्यमिक मंडळाने गंभीर दखल : या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी पाच आरोपींवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. या पेपर फुटीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचणार असल्याचा सुतोवाच केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन शिक्षक असल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. तर तीन इसम हे स्थानिक परिसरातील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. संपूर्ण राज्यात खळबळ उडून देणाऱ्या या पेपर फूट प्रकरणात पोलीस यंत्रणा किती लवकर मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचते आणि त्याच्या मुस्क्या आवळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेरपरीक्षा होणार नाही :उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी प्रसिध्द झाली होती. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आले नाही, यामुळे इयत्ता १२ वी ची गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. सरकारने कॉपीमुक्त अभियानला सुरंग लागला आहे का हे तपासून बघावे अशी मागणी होत आहे. आरोपींमध्ये गणेश नागरे, पवन नागरे, गणेश पालवे, गोपाल शिंगणे यांचा समावेश आहे.

राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण :या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळच्या सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपारच्या सत्रात दुपारी २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित या विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही.



हेही वाचा :12th Maths Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर फुटल्या प्रकरणी सिंदखेड राजा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details