महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेट्रोलपंप लुटण्याचा तयारीत असलेले पाच जण पोलिसांच्या ताब्यात - buldana police news

मेहकर ते डोणगाव रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना बुलडाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Jan 28, 2021, 10:14 PM IST

बुलडाणा- मेहकर ते डोणगाव रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई बुधवारी (२६ जानेवारी) रात्री करण्यात आली. संतोष सिताराम पवार (वय ३१ वर्षे, रा. चायगाव), राजू शिवाजी इंगळे (वय २५, रा. बारई पाचला), किरण सोपान चव्हाण (वय २० रा. बारई पाचला), किशोर मामा चव्हाण (वय ४६ रा. बारई पाचला) व आकाश प्रकाश पवार (वय २७ रा. खाखरखेर्डा, मुळ रा. बारई), अशी अटक करण्यात आलेल्या पाच दरोडेखोरांचे नावे आहेत.

४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एका मोटारीसह तीन मोबाईल, दोन धारधार चाकू, दोरी, लाकडी दांडके, लोखंडी रॉड, मिर्ची पूड व रोख ३ हजार ३२० रुपये, असा एकूण ४ लाख ३४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा -बुलडाण्यात १० महिन्यानंतर वाजली घंटा.. 1 हजार 595 शाळा सुरू, 34 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

ABOUT THE AUTHOR

...view details