महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदर्श आचारसहिंता भंग प्रकरणी बुलडाण्यात पहिला गुन्हा दाखल; पोस्टमास्तर दोषी

चिखली शहरातील डाक विभागाच्या कार्यालयामध्ये खिडकीलगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह इंडियन पोस्ट बँकेचे फ्लेक्स प्रिंटिंग लावलेले असल्याची तक्रार या अॅपद्वारे निवडणूक विभागाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी निवडणूक विभागाच्या एक पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

By

Published : Mar 17, 2019, 11:53 AM IST

आदर्श आचारसहिंता भंग प्रकरणी बुलडाण्यात पहिला गुन्हा दाखल

बुलडाणा - निवडणूक आयोगाने कात टाकत डिजीटलकडे वाटचाल सुरू केली आहे. सामान्य नागरिकांसाठी अस्त्र ठरणाऱ्या सि-व्हिजल मोबाईल अॅप्सवर आलेल्या तक्रारीवरून बुलडाणा जिल्ह्यात पहिला आदर्श आचारसंहितेचा गुन्हा चिखली येथे शुक्रवारी १५ मार्च रोजी नोंदण्यात आला आहे. हा गुन्हा पोस्टमास्तर नारायण शालीग्राम रायपुरे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा निवडणूक विभागाची कारवाई

सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा सहज तक्रार करता यावी आणि आचारसंहितेचा कुठे भंग होत असेल तर त्याला आळा घालता यावा, या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने सि-व्हिजल मोबाईल अॅप तयार केले आहे. या मोबाईल अॅपच्या माध्यमातून निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास त्याची थेट ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची या ऑपमध्ये सुविधा नागरीकांना देण्यात आली आहे. तक्रारीनंतर १०० मिनिटांच्या आत कारवाई होणार आहे.

हे मोबाईल अॅप निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा म्हटल्या जात असून या ऑपद्वारे बुलडाणा जिल्ह्यातील पहिला आचारसंहितेचा भंग झाल्याचा गुन्हा चिखली पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. चिखली शहरातील डाक विभागाच्या कार्यालयामध्ये खिडकीलगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह इंडियन पोस्ट बँकेचे फ्लेक्स प्रिंटिंग लावलेले असल्याची तक्रार या अॅपद्वारे निवडणूक विभागाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी निवडणूक विभागाच्या एक पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणीमध्ये आणि तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने चिखली डाक कार्यालयाचे पोस्टमास्टर नारायण शालीग्राम रायपुरे यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रिव्हेशलन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रोपर्टी अॅक्ट १९९५ च्या कलम ३ नुसार चिखली पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details