महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेगावात चित्रपटगृहात आग लागून पडदा जळाला; दीड लाखापर्यंत नुकसान - चित्रपटगृह

श्री गजानन चित्र मंदिरात 'रंपाट' या मराठी चित्रपटाचा  १२.३० वाजताचा शो सुरू होण्याआधी थिएटरचे दरवाजे उघडण्यात येत होते. यावेळी  थिएटरच्या पडद्याजवळील भागात आग लागल्याचे चित्रपटगृहाच्या कर्मचार्‍याला दिसल्यानंतर आग विझविण्यासाठी एकच धावपळ झाली.

शेगावात चित्रपटगृहात आग लागून पडदा जळाला

By

Published : May 19, 2019, 7:51 PM IST

बुलडाणा- शेगाव येथील श्री गजानन चित्र मंदिरात सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. नगर परिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी लवकर पोहोचल्याने आग लवकर विझवण्यात यश आले. तरीही चित्रपटगृहाचा पडदा व इतर साहित्य जळाल्याने जवळपास सव्वा ते दीड लाखापर्यंत नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आग शॉर्टसर्किटमूळे लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

शेगावात चित्रपटगृहात आग लागून पडदा जळाला

श्री गजानन चित्र मंदिरात 'रंपाट' या मराठी चित्रपटाचा १२.३० वाजताचा शो सुरू होण्याआधी थिएटरचे दरवाजे उघडण्यात येत होते. यावेळी थिएटरच्या पडद्याजवळील भागात आग लागल्याचे चित्रपटगृहाच्या कर्मचार्‍याला दिसल्यानंतर आग विझविण्यासाठी एकच धावपळ झाली.

याबाबात नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आल्यानंतर अग्निशमनदलाने घटनास्थळी पोहचले. थिएटरच्या पडद्याजवळ तसेच वरच्या बाजूला सिलिंग जळत असल्याचे दिसल्यानंतर अग्निशमन दलाकडून त्यावर पाण्याचा मारा करण्यात आला आणि दहा मिनिटांत आग विझविण्यात आली. या घटनेत चित्रपटगृहाचा पडदा व इतर साहित्य जळाल्याने जवळपास सव्वा ते दिड लाखापर्यंत नुकसान झाल्याची माहिती आहे. आग शॉर्टसर्किटमूळे लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details