बुलडाणा-शेगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भट्टड जिनिंग अँड प्रेसिंगला आज (शुक्रवारी) दुपारी अचानक आग लागली. या आगीत जिनिंगमधील बॉयलर आणि यंत्रे जळून खाक झाली. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने बाजूलाच असलेल्या रुईच्या गठांनी आणि कापसाच्या गंजीला आग लागली नाही.
शेगावच्या भट्टड जिनिंगला आग; बॉयलर जळून खाक - बुलडाणा बातमी
शेगाव शहरातील बसस्थानक परिसरात भट्टड यांच्या मालकीचे जिनिंग अँड प्रेसिंगचे केंद्र आहे. या केंद्रात हजारो क्विंटलच्या रुई गठानी आणि कापूस ठेवलेला आहे. यामध्ये आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास केंद्रातील बॉयलर आणि मशीनमध्ये अचानकपणे आग लागली.

हेही वाचा-धूत बंधुंना अटक करुन मालमत्ता जप्त करा; औरंगाबादेत व्हिडिओकॉन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
शेगाव शहरातील बसस्थानक परिसरात भट्टड यांच्या मालकीचे जिनिंग अँड प्रेसिंगचे केंद्र आहे. या केंद्रात हजारो क्विंटलच्या रुई गठानी आणि कापूस ठेवलेला आहे. यामध्ये आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास केंद्रातील बॉयलर आणि मशीनमध्ये अचानकपणे आग लागली. इमारतींमधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती शेगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर काही वेळातच अग्निशमन दल केंद्रात पोहोचले. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत किती नुकसान झाले याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.