महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबाबरवा अभयारण्याच्या इको सायन्स पार्कला आग - बुलडाणा जिल्हा लेटेस्ट न्यूज

अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम वसाली येथील अंबाबरवा अभयारण्याच्या इको सायन्स पार्कला आज आग लागल्याची घटना घडली. या घटनेत पार्कमधील गवत व अनेक वस्तू जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ग्रामस्थांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

अंबाबरवा अभयारण्याच्या इको सायन्स पार्कला आग
अंबाबरवा अभयारण्याच्या इको सायन्स पार्कला आग

By

Published : May 21, 2021, 8:10 PM IST

बुलडाणा -अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम वसाली येथील अंबाबरवा अभयारण्याच्या इको सायन्स पार्कला आज आग लागल्याची घटना घडली. या घटनेत पार्कमधील गवत व अनेक वस्तू जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ग्रामस्थांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पार्कमध्ये सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामामुळे पार्कमधील गवताने पेट घेतला असावा असा अंदाज आहे. दरम्यान थोड्याच वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. पार्कमध्ये लागलेल्या आगीचे लोट वसाली गावाकडे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे इको सायन्स पार्कला लागूनच आदिवासी समाजाच्या वस्तीचे देखील काम सुरू आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

अंबाबरवा अभयारण्याच्या इको सायन्स पार्कला आग

आगीत ठिबक सिंचन संचासह इतर साहित्य जळून खाक

अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी वसाली येथे ३२ कोटी रुपयांचा खर्च करून, ईको सायन्स पार्कची उभारणी करण्यात येत आहे. ३० हेक्टर क्षेत्रफळावर उभारण्यात येत असलेल्या उद्यानात २८ एकर क्षेत्रात २५ हजारांच्यावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. यात नारळ, आंबा, सिताफळ, बांबू व फुलझाडांचा समावेश आहे. सदर वृक्ष लागवड ईको नक्षत्र वनात करण्यात आली असून, पार्कच्या दूसऱ्या भागात आग लागली होती. आगीत ठिबक सिंचन संचासह इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. मात्र वन्यजीव विभागाकडून इतर नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा -पीपीई किटमधील घामापासून सुटका; पुण्याच्या निहालचे कोव्ह-टेक व्हेटिलेशन ठरतेय प्रभावी

ABOUT THE AUTHOR

...view details