बुलडाणा - थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील गायगाव येथे घडली. महावितरण कर्मचारी शत्रुघन गावंडे यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
महावितरण कर्मचारी शत्रुघन गावंडे यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घरी विद्युत बिलाची वसुली करण्यासाठी कसे काय गेले म्हणत मारहाण
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शेगाव येथील तंत्रज्ञ शत्रुघन गावंडे व त्यांचे सहकारी हे गुरुवारी शेगाव तालुक्यातील गायगाव येथील थकीत वीजबिल असलेल्या ग्राहकांकडे बिलवसुलीच्या संदर्भातील सूचना देण्यासाठी गेले होते. यामध्ये राजेंद्र गुलाबराव सोनोने याने तुम्ही आमच्या घरी विद्युत बिलाची वसुली करण्यासाठी कसे काय गेले होते, असे म्हणत वाद करून अंगावर धावून गेले. तसेच चापटा व लाथा-बुक्ंक्यानी मारहाण करून शिवीगाळ केली, जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारीवरून आरोपी सोनोने व त्याच्या दोन साथीदारांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे व धमकी देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.