महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जी-फॉर्म' च्या वादातून आरटीओ व स्कूल चालकामध्ये मारहाण, परस्परविरोधी तक्रारी - उपप्रादेशिक परिवहन महिला अधिकारी जयश्री दुतोंडे

बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांचे खाजगी वाहन चालक योगेश व सोमेश ड्रायव्हिंग स्कूल चालकाचा भाऊ सतीश पवार यांच्यामध्ये कागदपत्रांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची स्वाक्षरी न झाल्यावरून मारहाण झाली आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दुतोंडे

By

Published : Jul 24, 2019, 8:49 AM IST

Updated : Jul 24, 2019, 11:23 AM IST

बुलडाणा - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या खाजगी वाहनाचा चालक आणि सोमेश ड्रायव्हिंग स्कूल चालकाच्या भावामध्ये मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारीच्या सुमारास घडली. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन महिला अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी बेकायदेशीर कागदावर स्वाक्षरी करण्याकरिता, माझ्यावर आणि माझ्या वाहनचालकावर हल्ला केल्याची तक्रार बुलडाणा शहर पोलीस ठाण्यामधे केली आहे. तर रंगनाथ पवार यांच्या तक्रारीवरून आरटीओ दुतोंडे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीची तक्रार विचाराधीन आहे.

'जी-फॉर्म' च्या वादातून आरटीओ व स्कूल चालकामध्ये मारहाण, परस्परविरोधी तक्रारी

आरटीओ दुतोंडे यांच्या तक्रारीवरून सतीश पवार, दिपक पवार, रंगनाथ पवार यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून दिपक पवार, रंगनाथ पवार यांना अटक केली आहे. तर जातीवाचक शिवीगाळ करत भावाला मारहाण केल्याप्रकरणी रंगनाथ पवार यांच्या तक्रारीवरून आरटीओ दुतोंडे यांच्या विरुद्ध अट्रोसिटीची तक्रार विचाराधीन आहे. विशेष म्हणजे मारहाणी दरम्यान आरटीओ जयश्री दुतोंडे या घटनास्थळी उपस्थित नसल्याचे प्रत्यक्षदर्शी माजी नगरपालिका उपाध्यक्ष जुनेद यांचे म्हणणे आहे.
दलालांनी भरलेल्या बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी वेगळेच दृष्य पहायला मिळाले. दुपारी 1 वाजताच्या सुमारास बुलडाणा आरटीओ जयश्री दुतोंडे यांचे खाजगी वाहन चालक योगेश व सोमेश ड्राव्हीग स्कुल चालकाचा भाऊ सतीश पवार यांच्यामध्ये कागदपत्रांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची स्वाक्षरी न झाल्यावरून मारहाण झाली. ही मारहाण 'जी-फॉर्म' च्या माध्यमातून वरच्या कमाईसाठी झाल्याची चर्चा परिसरात आहे.
दरम्यान बेकायदेशीर कागदावर स्वाक्षरी करण्याकरिता माझ्यावर आणि माझ्या वाहनचालकावर हल्ला केल्याची तक्रार आरटीओ जयश्री दुतोंडे यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्याकडून हीन वागणूक दिली जात असल्याची तक्रार पवार यांनी केली आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांविरूद्धची अॅट्रॉसिटीची तक्रार सध्या चौकशीवर ठेवण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
भांडणा दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित नव्हत्या-प्रत्यक्षदर्शी सै. जुनेद
नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सै जुनेद हे वाहनाच्या परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात उपस्थित होते. याचदरम्यान दोन लोकांमध्ये भांडण सुरु झाले. या भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या प्रत्यक्षदर्शी सै. जुनेद यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दुतोंडे घटनास्थळी उपस्थित नसल्याचे सांगितले आहे.

Last Updated : Jul 24, 2019, 11:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details