महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यातील जामोदमध्ये गोठ्याला भीषण आग, 2 वासरांचा मृत्यू - Buldana marathi news

बुलडाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यातील जामोद येथील अशोक लोने यांच्या डोंगरवेस भागाजवळील गुरांच्या गोठ्याला आग लागली.

जामोदमध्ये गोठ्याला भीषण आग
जामोदमध्ये गोठ्याला भीषण आग

By

Published : Jan 30, 2021, 9:05 PM IST

बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यातील जामोद येथील अशोक लोने यांच्या डोंगरवेस भागाजवळील गुरांच्या गोठ्याला आग लागली. ही घटना आज शनिवारी 30 जानेवारी रोजी घडली. या आगीमध्ये गोठ्यातील दोन वासरू, शेतीपयोगी साहित्यांसह गुरांचा चारा जळून खाक झाले. यामध्ये जवळपास 2 लाख 31 हजाराचे नुकसान झाले आहे.

बुलडाण्यातील जामोदमध्ये गोठ्याला भीषण आग

परिसरातील शेतकऱ्यांचा आग विझविण्याचा प्रयत्न-

जामोद येथील अशोक लोने यांचा गुरांचा गोठा डोंगरेवेस या भागात आहे. या गुरांचा गोठ्यात तीन गाईंसोबत शेतीपयोगी साहित्या व गुरांचा चारा होता. आज (शनिवार) गोठ्यात अचानक आग लागली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळी जळगांव जामोद नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी जळगांव जामोद पोलीस व अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. व एका गाईस वाचविण्याच यश आले. परंतू आग आटोक्यात आणेपर्यंत गोठ्यातील दोन वासरू, शेतीपयोगी साहित्य व गुरांचा चारा जळून खाक झाला.

हेही वाचा-क्रुरकर्मा.. मुलाने आईची हत्या करून अंगणात जाळले अन् चितेवर कोंबडी भाजून खाल्ली

ABOUT THE AUTHOR

...view details