बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर तहसील कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याने विष घेतल्याची घटना घडली. अलका नंदु चव्हाण असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. अलका यांना मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जळगाव येथे पाठवण्यात आले. महिला कर्मचाऱ्याने कार्यालयातच विष घेतल्याने मलकापुरात खळबळ उडाली आहे.
अलका चव्हाण या मलकापूर तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर त्यांनी कार्यालय उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण गुलदस्त्यात आहे.