बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात बनविलेल्या जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीतील महिला आरोपीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. यामुळे कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बुलडाणा शहर पोलीसांनी पंचनामा करून गळफास घेतलेल्या महिलेला खाली उतवले. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव अकियाबी मुनाब खाँ (वय.20) असे आहे. आरोपी महिला धामणगांव बढे येथील रहवासी होती.
बुलडाण्याच्या तात्पुरत्या कारागृहात महिला आरोपीची गळफास घेवून आत्महत्या - Suicide by strangulation of female accused
बुलडाण्यात तात्पुरत्या स्वरुपाच्या जिल्हा कारागृहात महिला आरोपीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी बुलडाणा पोलीस अधिक तपास करत आहेत.
![बुलडाण्याच्या तात्पुरत्या कारागृहात महिला आरोपीची गळफास घेवून आत्महत्या Female accused commits suicide by hanging in Buldana temporary jail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10119681-189-10119681-1609778172754.jpg)
बुलडाण्याच्या तात्पुरत्या कारागृहात महिला आरोपीची गळफास घेवून आत्महत्या
आत्महत्या का केली याचा तपास सुरू -
धामणगांव बढे येथील रहवासी अकियाबी मुनाब खाँ हीला रायपूर पोलिसांनी कलम 394 भादवी 34 गुन्ह्यामध्ये अटक केले होते. दरम्यान ती न्यायालयीन कोठडीत होती,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी संध्याकाळी तिने ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात बनविलेल्या जिल्हा कारागृहात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. अशा कोणत्या कारणामुळे अकिया बी ने आत्महत्या केली आहे. याचा तपास बुलडाणा शहर पोलिस करत आहेत.