महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करण्यासाठी बुलडाण्यात झाडावर चढून 'स्वाभिमानी'चे आत्मक्लेश आंदोलन - बुलडाणा आंदोलन बातमी

शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करण्यासाठी व दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

buldana
बुलडाण्यात झाडावर चढून 'स्वाभिमानी'चे आत्मक्लेश आंदोलन

By

Published : Dec 3, 2020, 3:24 PM IST

बुलडाणा - शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करण्यासाठी व दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तृत्वात आज (गुरुवार) संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढून अर्धनग्ण होऊन आत्मक्लेश आंदोलन केले आहे.

बुलडाण्यात झाडावर चढून 'स्वाभिमानी'चे आत्मक्लेश आंदोलन

या आंदोलनामधे युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, नयन इंगळे, विलास बोडखे, मनोहर मोरखडे, प्रशांत बावस्कार, गोकुळ गावंडे, अमोल आगरकर, गजानन सोळे, प्रमोद बान्हेरकर, जया ठाकरे, विष्णुदास मुरुख, विशाल गव्हाळे, शिवचरण बान्हेरकर, निखिल गावंडे, महादेव तेल्हारकर, ऊमेश नेरकर,प्रतिक उमाळे, दामु सोळे, अक्षय नेरकर, शुभम ठाकरेसह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱयांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन- प्रशांत डिक्कर

हेही वाचा -'एमडीएच' मसाल्यांचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन; जगातील सर्वाधिक वयाचे सीईओ म्हणून होती ओळख..

दिल्लीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून लाखो शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्या आंदेलनाला पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी यांनी आज राज्यभर आंदोलन पुकारले आहे. त्याच धरतीवर संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढून केंद्र सरकारचा निषेध करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱयांनी अर्धनग्ण होऊन आत्मक्लेश आंदोलन केले.

झाडावर चढून केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी

शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध असो, दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱयांना न्याय मिळालाच पाहीजे, एकच गट्टी राजू शेट्टी यावेळी अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलन दरम्यान शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करा. दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलकांच्या मागण्या मान्य करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

हेही वाचा -"मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, असे कोणाला वाटत असेल तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही"

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱयांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details