बुलडाणा -जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. प्रशासन स्तरावर पंचनामे पूर्ण होत आले असले तरी सरकार स्थापन झाले नसल्याने शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील सव्वा सहा लाख हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून साडेसहा लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४७८ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.
बुलडाणा : पंचनामे पूर्ण होऊनही सरकार स्थापन न झाल्याने नुकसानभरपाई रखडली - बुलडाणा शेती पंचनामे
सरकार स्थापन झाले नसल्याने शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यातील सव्वा सहा लाख हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून साडेसहा लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४७८ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.
शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत
हेही वाचा -ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी, दीड लाखांचे होते कर्ज
ज्या सरकारकडे मदत मागायची आहे ते सरकारच अद्याप स्थापन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान कित्येक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही. आपले अनुदान जमा झाले की नाही, हे पाहण्यासाठी शेतऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.