महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खामगाव : भुईमुंगाला भाव न मिळाल्याने शेतकरी आक्रमक; बाजार समितीत पोलीस बंदोबस्त तैनात

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुंगाला 3 ते 3500 रूपये दरम्यान भाव देण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले. आमचा खर्चही या पैशातून निघत नसल्याने त्यामुळे आम्हाला योग्य भाव देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी आज शुक्रवारी 28 में रोजी आक्रमक झाले.

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बातमी
खामगाव : भुईमुंगाला भाव न मिळाल्याने शेतकरी आक्रमक; बाजार समितीत पोलीस बंदोबस्त तैनात

By

Published : May 28, 2021, 4:31 PM IST

बुलडाणा -जिल्ह्यतील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुंगाला 3 ते 3500 रूपये दरम्यान भाव देण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. आमचा खर्चही या पैशातून निघत नसल्याने त्यामुळे आम्हाला योग्य भाव देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी आज शुक्रवारी 28 में रोजी आक्रमक झाले. यावेळी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यावेळी पोलीस बंदोबस्त ही लावण्यात आला होता.

भुईमुंगची आवाक वाढल्याने भाव पाडल्याचा आरोप -

विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लॉकडाऊननंतर आपला माल बाजारात विकण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. अशातच आज शुक्रवारी भुईमुंगची आवाक वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडले. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोलिसांचा बंदोबसंत लावण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आम्हाला योग्य हमीभाव देण्यात यावा, ही मागणी लावून धरली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मुकुटराव भिसे आणि इतरांनी शेतकऱ्यांच्या सोबत चर्चा करत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - मुंबईत आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; अनेक जिल्हा पेट्रोलचे दर शंभरीपार

ABOUT THE AUTHOR

...view details