बुलडाणा- समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतात जात आहे. धुळीला कंटाळून मेहकर तालुक्यातील कल्याण शिवारातील संतप्त शेतकरी अनिरुद्ध तांगडे यांनी हातात कुऱ्हाड घेत बुधवारी (दि. 20 जानेवारी) दुपारी रस्त्याचे काम बंद पाडले. यावेळी शेतकऱ्याचे रौद्ररूप पाहून रस्ता तयार करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तसेच कामावरील वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
धुळीमुळे शेतमजूर शेतात येत नाही
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील 36 किलीमोटरचा समृद्धी महामार्गाचे काम आपको कंपनी मार्फत सुरू आहे. या महामार्गाच्या खालच्या बाजूला रस्ता आहे. या ठिकाणाहून दिवसभर महामार्गाच्या कामावरील ट्रक ये-जा करत असतात. यामूळे रस्त्यालगतच्या शेतात मोठ्या प्रमाणात धुळ जात असते. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. सध्या तूर, हरभरा, गहू संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा आहे. धुळीमुळे शेतामध्ये मजूर कामाला येत नाहीत. शेतकरी हा केवळ रस्त्याच्या धुळीला त्रस्त झालेला आहे.
नियमाप्रमाणे रस्त्यावर पाणी मारले जात नाही
कंपनीने नियमाप्रमाणे दिवसातून तीन वेळा या रस्त्याला पाणी मारले पाहिजे जेणेकरून धूळ उडणार नाही. पण, कंत्राटदार रस्त्यावर पाणीच मारत नसल्याने कंटाळून कल्याण या गावातील राहणारे शेतकरी अनिरुद्ध तांगडे यांनी चक्क हातामध्ये कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर उभे राहून बुधवारी दुपारपासून कामावरील संपूर्ण वाहतूक बंद केली आहे. संबंधित अधिकाऱ्याला बोलविल्याशिवाय वाहन पुढे जाऊ देणार नाही. मी कोणाच्या दारी जाऊन निवेदन देणार नाही सांगणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे आपको कंपनीच्या अधिकाऱ्यांची यावेळी तारांबळ उडाली आहे.
अन्यथा काम बंद पाडू