बुलडाणा - लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावाच्या एका शेतकऱ्याने शाखा स्टेट बँक मॅनेजरच्या कानशिलात लावल्याचा प्रकार सोमवारी 29 जूनला दुपारी घडला. संबंधित प्रकार बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी मॅनेजरच्या तक्रारीवरून बिबी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोन्ही शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांना अटक करण्यात आली आहे.
बुलडाण्यात संतप्त शेतकऱ्याने बँक मॅनेजरच्या लावली कानशिलात; गुन्हा दाखल - बिबी पोलीस स्टेशन
लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावाच्या एका शेतकऱ्याने शाखा स्टेट बँक मॅनेजरच्या कानशिलात लावल्याचा प्रकार सोमवारी 29 जूनला दुपारी घडला. संबंधित प्रकार बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बुलडाण्यात संतप्त शेतकऱ्याने बँक मॅनेजरच्या लावली कानशिलात; गुन्हा दाखल
संबधित प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मॅनेजर राहुल लटपटे यांच्या तक्रारीवरून अशोक विठ्ठल दायमा व त्यांचे वडील विठ्ठल दायमा या दोन्ही शेतकऱ्यांच्या विरोधात बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कलम ३५३ /३३२ /२९४ /५०६ /भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून शेतकऱ्यांना अटक करण्यात आले आहे.