महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक, राजुर घाटातून घेतलं ताब्यात - Rail Roko Protest

Ravikant Tupkar arrested : पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी भूमिगत झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलडाणा शहर पोलिसांनी आज, गुरुवारी सायंकाळी उशिरा राजूर घाटातून अटक केली. त्यांना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय.

Ravikant Tupkar arrested
Ravikant Tupkar arrested

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 11:00 PM IST

बुलडाणाRavikant Tupkar arrested : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. सोयाबीन, कापूस आदी मागण्यांकडं केंद्र तसंच राज्य सरकार सातत्यानं डोळेझाक करत असल्याचा आरोप करत तुपकर यांनी शुक्रवारी (दि. 19) करत रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा केली. मात्र, रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तुपकर यांचे कार्यकर्ते बुलडाणा शहर पोलीस ठाण्यासमोर जमले असून घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळं तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तुपकरांच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त :शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 19 जानेवारीला रेल्वे रोकोचा इशारा दिल्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकर भूमिगत झाले होते. त्याचवेळी त्यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रविकांत तुपकर यांना अटक : सोयाबीन कापूस प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तुपकर काल रात्रीपासून भूमिगत होते. अखेर पोलिसांनी त्याला राजुरा घाटातून ताब्यात घेतलं. 19 जानेवारी रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली, गुजरातकडं जाणाऱ्या गाड्या रोखण्याचा इशारा दिला होता. आंदोलन दडपण्यासाठी गुरुवारी (दि. 18) रात्री मलकापूरला पोहोचण्यापूर्वीच बुलडाणा पोलिसांनी रविकांत तुपकर याला अटक केली. मी गुन्हा केला नसून मला अटक का केली, असा सवाल त्यांनी मला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना विचारला आहे.

काल रात्रीपासून तुपकर भूमिगत :मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, गुजरातकडे जाणारी प्रत्येक गाडी कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थांबवली जाईल, असा इशारा तुपकर यांनी दिला होता. त्यानंतर शेगाव लोहमार्ग पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. मात्र, तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम होते. दरम्यान, काल रात्रीपासून तुपकर भूमिगत झाले होते.

हेही वाचा -

  1. वडोदरा येथील तलावात शाळकरी मुलांची बोट उलटली, 15 जणांना जल समाधी
  2. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळं ठाकरे गटावरील दबाव वाढला, वाचा कोण-कोण आले रडारवर?
  3. मुंबईला जाणार म्हणजे जाणारच; जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

ABOUT THE AUTHOR

...view details