बुलढाणा :जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी लुटल्याचा आरोप केला जात आहे. तसेच पीक विमा कंपन्यांनी मोठा घोळ केल्याचा दावा केला जात आह . भरलेला पीक विमा आणि मिळालेला पीक विमा यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे शेतकरीनेते रविकांत तुपकर(Farmer leader Ravikant Tupkar) प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला (agitation became furious) होता.
विमा कंपनीच्या जिल्हा कॉर्डीनेटरला रविकांत तुपकरांनी डांबून ठेवले होते. शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका तुपकरांनी घेतली होती. दरम्यान विमा कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तुपकरांसह शेतकऱ्यांनी विमा कंपनीचा जिल्हा कॉर्डीनेटर दिलीप लहाने (district coordinator of insurance company) याला गाडीत कोंबून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात (Tupkar reached police station) नेले. तिथे त्याच्यासह जिल्ह्यातील १३ तालुका कॉर्डीनेटर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.