महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाय शोधायला गेलेल्या शेतमजूराचा जंगलात सापडला मृतदेह, अस्वलाच्या हल्ल्याची शक्यता

वरवंड या गावातील शेतमजूर किसन सुरुशे हे त्यांची गाय हरवल्याने मंगळवारी तिला शोधण्यासाठी वरवंट गावापासून 3 किमी अंतरावर असलेल्या जंगलात शोधण्याकरता गेले होते. मात्र, बुधवारी सकाळी विजय जाधव यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

वरवंटच्या शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार
वरवंटच्या शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

By

Published : Apr 30, 2020, 8:33 AM IST

Updated : Apr 30, 2020, 4:30 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील बुलडाणा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वरवंड गावापासून काही अंतरावरील एका शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. किसन त्र्यंबक सुरुशे (वय 45) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे. अनेकवेळा ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगत असलेले गाव वरवंड, डोंगरखंडाळा, डोंगरशेवली, श्रीकृष्ण नगर या भागात अस्वल व मानवी संघार्षामुळे अनेक शेतकरी व शेतमजूर जखमी झाले आहेत. तर, अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशातच बुधवारी अस्वलाच्या हल्ल्यात किसन सुरुशे हा शेतमजूर ठार झाल्याची घटना समोर आली.

वरवंड या गावातील शेतमजूर किसन सुरुशे हे त्यांची गाय हरवल्याने मंगळवारी तिला शोधण्यासाठी वरवंट गावापासून 3 किमी अंतरावर असलेल्या जंगलात शोधण्याकरता गेले होते. मात्र, बुधवारी सकाळी विजय जाधव यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याबाबत वनविभाग व पोलिसांना देण्यात कळवण्यात आले.

पंचनामा करण्यासाठी बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे, वर्तुळ अधिकारी राहुल चव्हाण, वनरक्षक मोरे, कलीम बिबन शेख, वन्यजीव विभागाचे गिते व इतर घटनास्थळी हजर झाले होते. मृत शेतमजूर यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केल्याचे वनविभागाचे वर्तुळ अधिकारी राहुल चव्हाण यांचा म्हणणे आहे. त्यानंतर, सुरुशे यांचा मृतदेह बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

Last Updated : Apr 30, 2020, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details