महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पुन्हा आणूया आपले सरकार'.. भाजपचा टी शर्ट घालून बुलडाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या - बुलडाणा बातम्या

शेगाव तालुक्यातील खातखेळ गावातील एका 35 वर्षीय शेतकऱ्याने 'पुन्हा आणूया आपले सरकार' असे लिहलेला भाजपचा टी शर्ट घालून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

Farmer commits suicide

By

Published : Oct 13, 2019, 2:24 PM IST

Updated : Oct 13, 2019, 2:43 PM IST

बुलडाणा - शेगाव तालुक्यातील खातखेळ गावातील एका 35 वर्षीय शेतकऱ्याने 'पुन्हा आणूया आपले सरकार' असे लिहिलेला भाजपचा टी शर्ट घालून शेतात गळफास घेतला आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या जळगाव जामोद मतदारसंघात शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

हेही वाचा -खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सक्षम - थोरात

राजू ज्ञानदेव तलवारे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे आज 13 ऑक्टोबर रविवारी बुलडाणा जिल्ह्यात तीन ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असून कामगार मंत्री कुटे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री जळगाव जामोद येथे येत आहेत. त्यांच्या सभा स्थळापासून वीस किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे.

हेही वाचा -स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हाच सत्ताधाऱ्यांचा धंदा - अजित पवार

आत्महत्या केलेला शेतकरी अल्पभूधारक असून त्याच्यावर दोन लाख रुपये कर्ज झाल्याने तो मागील काही दिवसांपासून तणावात होता. असे असतानाही जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रचारासाठी मागील आठ दिवसांपासून तो सक्रिय होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

Last Updated : Oct 13, 2019, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details