बुलडाणा- यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच या नुकसानीची शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याच्या नैराशातून देऊळगावमधील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी ही घटना समोर आली. अमोल श्रीपत शिंगणे (वय 35) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - बुलडाणा बातमी
अतिवृष्टीने पीक नष्ट झाले व शासनाकडून कुठलीच अपेक्षित मदत मिळाली नाही. तसेच सततची नापिकी व कर्जपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केली.
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
हेही वाचा -बुलडाण्यात टेम्पोची दुचाकीला धडक एक ठार, एक गंभीर
अतिवृष्टीने पीक नष्ट झाले व शासनाकडून कुठलीच अपेक्षित मदत मिळाली नाही. तसेच सततची नापिकी व कर्जपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.