महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी, दीड लाखांचे होते कर्ज - खामगाव तालुक्यात पहिला बळी

राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटत नाही. त्यामध्ये शेतकरी पिचला जात आहे. मात्र, आमदारांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. गेल्या १० वर्षामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मृत शेतकरी

By

Published : Nov 15, 2019, 7:03 PM IST

बुलडाणा -परतीच्या पावसाने ४ एकरातील सोयाबीन आणि इतर पिके मातीमोल झाली. मात्र, शेतीपिकांच्या नुकसानीचा पंचनामाही झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. बोरी अडगाव येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता ही घटना उघडकीस आली असून खामगाव तालुक्यातील हा पहिला बळी ठरला आहे.

ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी

हे वाचलं का? - लातुरातील शेतकरी संभ्रमात; मदत त्वरित द्या, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही

गणेश विठ्ठल मेतकर (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे ४ एकर शेती आहे. त्यांच्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपये कर्ज आहे. त्यात जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. कपाशी, उडीद, मूग, तूर या हाताशी आलेल्या पिकांची परतीच्या पावसामुळे नासाडी झाली आहे. खामगाव तालुक्यात बोर अडगावमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. पिकांचे पूर्णपणे नुकसान झाल्यामुळे ते व्यथित झाले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह, आजारपण, मुलांचे शिक्षण आदि, कसे करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सकाळी घरी कोणी नसताना विष पिऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

हे वाचलं का?- यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस, कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटत नाही. त्यामध्ये शेतकरी पिचला जात आहे. मात्र, आमदारांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. गेल्या १० वर्षामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details