महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंधन दरवाढीमुळे शेतकरी हैराण

इंधन दरवाढीचा फटका शेतकरी व सर्वसामान्यांना बसत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना आपले पीक विकूनही नफा होत नसल्याने शेतकरी हैराण आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Dec 29, 2020, 9:20 PM IST

Updated : Dec 29, 2020, 10:21 PM IST

बुलडाणा- इंधन दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांनाच नव्हे तर आस्मानी व सुल्तानी संकटाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांनाही बसत असल्याचे पहावयास मिळत आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातून पिकवलेल्या मालाची वाहतूक करण्यास तीनपट भाडे मोजावे लागत आहे. यामुळेच पालेभाज्या मार्केटमध्ये नेवूनही नफा तर नाहीच उलट तोटा होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय वाहतूक करणारे ही इंधन दरवाढीमुळे शासनावर नाराज आहेत.

व्यथा मांडताना शेतकरी व रिक्षा चालक

चिखली तालुक्यातील डोगरशेवली या छोट्याशा गावात बबन रामरतन सावळे हे आपल्या दोन एकर शेतात अनेक वर्षांपासून पालेभाज्यांचा उत्पन्न घेत पालेभाज्यांचा व्यवसाय करतात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांचा डोगरशेवली येथून ते कधी बुलडाणा तर कधी चिखली दोन्ही शहराच्या सारख्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेत आपल्या पालेभाज्यांची वाहनाने वाहतूक करतात. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वेळी त्यांना वेगवेगळे वाहतूक भाडे भरावे लागते. इंधन दरवाढीमुळे पूर्वी त्यांचा जेवढा वाहतूक खर्च येत होता, त्याच्या तीनपट वाहतूक खर्च आता येत असल्याने उदरनिर्वाह करणे मुश्किल झाल्याचे म्हणत आहेत.

भाडे वाढमुळे प्रवासी अन् शेतकऱ्यांना परवडत नाही

डोगरशेवली या गावात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राजू सोनुने हे रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करत आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीमुळे प्रवासी आणि शेतकऱ्यांनाही जास्त पैसे मोजावे लागत आहे. यामुळे शेतकरी व प्रवाशांना प्रवास परवडत नाही. यामुळे सरकारने इंधन दर स्थिर करावे, अशी विनंती राजू सोनूने यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर घसरले आसतानाही कमी झाले नाही इंधनाचे दर

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अनलॉकनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर घसरले होते. याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल, असे वाटत होते. मात्र, उलट नोव्हेंबर महिन्यात वारंवार इंधन दरवाढ झाली आहे.

हेही वाचा -चोरीची तक्रार दिल्यामुळे बुलडाण्यात दिराने केला वहिणीचा खून

हेही वाचा -बुलडाणा : रेतीची अवैध वाहतूक करणार्‍या टिप्पर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Last Updated : Dec 29, 2020, 10:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details