महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात आढळले बनावट नोटा छापण्याचे मशीन? मलकापूर पोलिसांनी प्रिंटिंग मशिन्स केल्या जप्त - मलकापूर पोलिसांनी प्रिंटिंग मशिन्स केल्या जप्त

Fake Currency Case Buldana: बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात बनावट नोटा छापण्याच्या मशीन्स आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. (Jaggu Don Buldana) शहरातील कुख्यात जग्गू डॉन याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्यानंतर त्याने बनावट नोटा छापण्याचे मशीन आणल्याची गोपनीय माहिती मलकापूर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे जग्गू डॉनच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात मशीन मिळाल्या नाहीत. (Fake currency printing machine)

Fake Currency Case Buldana
प्रिंटिंग मशिन्स केल्या जप्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 9:31 PM IST

बनावट चलन प्रकरणी माहिती देताना मलकापूरचे पोलीस अधिकारी

बुलडाणाFake Currency Case Buldana :पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून शहरातील एका शाळेच्या इमारतीत असलेल्या पत्र्याच्या खोलीत नोटा छापणाऱ्या मशीन्स आढळून आल्या आहेत. त्यामुळे या जग्गू डॉनने या मशीन बनावटी नोटा छापण्याकरिता आणल्या होत्या का? अशी चर्चा बुलडाणा जिल्ह्यात रंगू लागल्या आहेत. (Police Action In Fake currency case)

डॉनवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल:मलकापूर पोलिसांनी या मशीन आपल्या ताब्यात घेतल्या असून विविध कलमान्वये आरोपी जग्गू डॉन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंच या मशीन बनावटी नोटा छापण्याकरिता आणण्यात आल्या होत्या का? याबाबतचा पुढील तपास मलकापूर पोलीस नाशिक करन्सी प्रेसच्या सहाय्याने करणार आहे. याप्रकरणी पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

झटपट श्रीमंतीसाठी अवलंबिला 'हा' मार्ग:अनेक वेळा डिजिटल फ्रॉड करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्याच्या घटना आपल्या कानावर येतात. त्यामुळे आता त्यापेक्षाही पुढे जाऊन चक्क आपली स्वतंत्र अवैध बँक किंबहुना अमाप पैसा विना परिश्रम छापण्याचे विचार समाजात वाढत आहे, असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. आजच्या काळात झटपट श्रीमंत होण्याची इच्छा आणि झगमक राहणीमानाच्या हव्यासापोटी तरुण पिढी आणि काही गुन्हेगार बनावटी चलन छापण्याच्या मार्गाकडे वळत आहेत. अशातच बुलडाण्यात चक्क बनावटी नोट छापण्याची मशीन पोलिसांनी जप्त केल्यानंतर सर्वजण अवाक् झाले. अशा प्रकरणात गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

सोलापुरात आढळले बनावट नोट प्रकरण : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी शहरांमध्ये डिसेंबर, 2022 मध्ये बनावटी नोटांचे प्रकरण समोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयीन तरुण हे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका गुप्तदारामार्फत मिळाली होती. सोलापूर एलसीबीच्या पोलीस पथकाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास कुर्डूवाडी शहरातील टेंभुर्णी चौकामध्ये सापळा लावला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून अडीच लाखांच्या बनावटी नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.

आणखीण एकास ताब्यात घेऊन चौकशी सुरू : हर्षल लोकरे या महाविद्यालयीन तरुणास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याला या बनावट नोटा सुभाष काळे याने चलनात आणण्यासाठी दिल्या होत्या. पोलीस पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ दुचाकी (एम एच ४५ जे ३७०४) वर थांबलेल्या सुभाष काळे यास ताब्यात घेतले. त्यावेळी काळे याच्याकडेही बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी हर्षल लोकरे व सुभाष काळे या दोघांनाही अटक केली. दोघांकडून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.

हेही वाचा:

  1. खेडोपाड्यात शाळेत गुरुजी नाहीत आणि आपण म्हणतोय भारत विश्वगुरू, कन्हैया कुमारची उपरोधिक टीका
  2. आगीमध्ये रोज लोक होरपळून मरतायत, सरकार मात्र ढिम्म, हलगर्जीपणा चालणार नाही - मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय
  3. दादरमधील भरतक्षेत्र साड्यांच्या दुकानावर ईडीची छापेमारी सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details