बुलडाणा - शासकीय कार्यालयात अधिकारी-कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कामकाजवर परिणाम पडत आहे. असा परिणाम जिल्ह्यातील माजी सैनिक रुग्णालयावर पडला आहे. बुलडाण्याच्या जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या कार्यालयातील माजी सैनिक रुग्णालयातील दोन डॉक्टर व दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने आज बुधवारी 17 मार्च पासून 14 दिवस रुग्णालय बंद ठेवण्यात आल्याचे पत्र लावण्यात आले आहे. यामुळे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या माजी सैनिकांची तारांबळ उडत आहे.
बुलडाण्यात डॉक्टर व कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने माजी सैनिकांचे रुग्णालयाल बंद
पॉलीक्लिनिक रुग्णालयात केवळ 9 अधिकारी-कर्मचारी सेवा देत आहेत. ज्यामध्ये 2 डॉक्टर आणि उर्वरित कर्मचारी आहेत. यापैकी 2 डॉक्टर आणि 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालय उघडे ठेवणे शक्य नाही.
बुलडाण्यात डॉक्टर व कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने माजी सैनिकांचे रुग्णालयाल बंद
रुग्णाची वेगळी व्यवस्था असून उपचारासाठी लागणारा खर्च मिळते परत -
पॉलीक्लिनिक रुग्णालयात केवळ 9 अधिकारी-कर्मचारी सेवा देत आहेत. ज्यामध्ये 2 डॉक्टर आणि उर्वरित कर्मचारी आहेत. यापैकी 2 डॉक्टर आणि 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालय उघडे ठेवणे शक्य नाही. रुग्णालय बंद ठेवल्याने रुग्णाची गैरसोय होणार नाही. शहरातील डॉ.लद्धड हे पॅनल असल्याकारणाने गंभीर परिस्थितील रुग्णांना त्याठिकाणी उपचार देण्यात येतील व ज्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहे. त्यांना उपचारासाठी लागलेला संपूर्ण खर्च परत मिळत असते, अशी प्रतिक्रिया डॉ.सुनील मानमोडे यांनी दिली आहे.