महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धरणाच्या गाभ्यात काळी माती नसल्याने धरण फुटले असावे - विजय पांढरे - विजय पांढरे

बांधलेले धरण १०० वर्ष फुटत नाही. मात्र तिवरे धरण १८ ते २० वर्षातच फुटले. त्यामुळे या धरणाच्या बांधकामाबाबत विजय मांढरे यांनी शंका उपस्थित केली.

विजय पांढरे

By

Published : Jul 3, 2019, 8:56 PM IST

बुलडाणा - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून दुर्घटना घडल्याने हाहाकार उडाला. 20 वर्षांपूर्वी बांधलेले हे धरण नादुरुस्त असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र हे धरण बांधताना त्याच्या गाभ्यात काळी माती नसल्याने हे धारण फुटले असावे, असे मत जलसंपदा विभागाचे माजी अधीक्षक अभियंता विजय मांढरे यांनी व्यक्त केले.

विजय पांढरे


यावेळी बोलताना ते म्हणाले, की धरणाला कमीत-कमी शंभर वर्ष काही होत नाही. हे धरण केवळ 18 ते 20 वर्षात फुटले. म्हणूनच धरणाच्या कामात क्वॉलिटी मेंन्टेन केली नसल्याचा दावा पांढरे यांनी केला.


विजय पांढरे यांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा बाहेर काढला होता. तिवरे धरणाबाबत 2 वर्षाअगोदर लीकेजबाबत तक्रार आल्यानंतर खात्याने याबाबत पूर्ण चौकशी करायला हवी होती. त्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे होती. मात्र ती केलेली दिसत नाही. केवळ वरवरची थातूर-मातूर उपाय करून डागडुजी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो, असेही ते म्हणाले. योग्य प्रकारे दुरुस्ती न झाल्यामुळे या पावसाळ्यात धरण फुटून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details