महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून पाकिस्तानला संपवलं पाहिजे - माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत - brigadier sudhir sawant news

माजी खासदार व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादामुळे 10 हजार सैनिक मारले गेले. मुळातच पाकिस्तान सरकारचा धंदाच ड्रग्ज विकणे आहे. भारतात ड्रग्ज पाकिस्तानमधूनच येत आहे. त्यामुळे पाकिस्तानलाच संपवले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच, राजकारण्यांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. सैन्य-पोलिस भरती आणि स्पर्धा परीक्षा घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

So Pakistan must end
...म्हणून पाकिस्तानला संपवलं पाहिजे - माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत

By

Published : Mar 21, 2021, 5:10 PM IST

बुलडाणा - माजी खासदार तथा माजी सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पाकिस्तानवर अनेक आरोप लावले आहेत. 'पाकिस्तानच्या दहशतवादामुळे 10 हजार सैनिक मारले गेले. मुळातच पाकिस्तान सरकारचा धंदाच ड्रग्ज विकणे आहे. पूर्ण जगामध्ये 90% हेरॉइन पाकिस्तानमधून जाते. आता बॉलीवूडच्या भानगडीत बघितलं असेल; येथे पाकिस्तानमधून ड्रग्ज येतात. ड्रग्ज आणणारे कोण तर ते दहशतवादी आहेत. त्यामुळे दहशतवाद वाढतो, संघर्ष वाढतो', असे सावंत यांनी म्हटले आहे. सैन्य व पोलीस भरती महाराष्ट्र शासनाने लवकर घ्यावी. तसेच स्पर्धा परीक्षेची परीक्षाही लवकर घ्यावी. या मागणीसाठी ते काल (शनिवार) बुलडाणा दौऱ्यावर आले असता स्थानिक विश्रामगृहत बोलत होते.

हेही वाचा -'केंद्रीय तपास यंत्रणा कामाला लावून महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा कट'

म्हणून पाकिस्तानला संपवलं पाहिजे -

पुढे ते म्हणाले, की तुम्ही मला सांगा काश्मीरमध्ये एकाही आमदार-खासदारला कोणी मारलं नाही. का नाही? सामान्य लोक मरतात, सैनिक मरतात. 10 हजार सैनिकांना मारले. कारण सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत. कारण यामुळे राजकीय पक्षांना फायदा होतो. कोणी या विषयावर बोलत नाही आणि म्हणून आमच्यासारखे जे बोलतात ते लोकांना आवडत नाही. म्हणून पाकिस्तानला संपवलं पाहिजे.

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत बोलताना....
सैन्य-पोलीस भरती, स्पर्धा परीक्षेची परीक्षा घेण्याची मागणी -
महाराष्ट्रात सैन्य व पोलीस भरती रखडली आहे. तसेच स्पर्धा परीक्षाही वेळेवर होत नाहीत. यामुळे विद्यार्थी निराश होत आहेत. परिणामी ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. म्हणून भरती आणि परीक्षा लवकर घ्याव्यात. तसेच, भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी 170 इंच उंची केली आहे. ती 164 करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.

हेही वाचा -अखेर दिवस उजाडला..! कोरोनाचे नियम पाळत एमपीएससीच्या परीक्षेला सुरुवात

आंदोलनाचा इशारा -

सावंत यांनी महाराष्ट्र सरकारकडे या मागण्या केल्या आहेत. शिवाय, जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर महाराष्ट्रभर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details