महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात 11 कोरोना रुग्ण वाढले; 8 जणांना डिस्चार्ज - Buldana latest news

शुक्रवारी बुलडाणा जिल्ह्यात 11 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर 8 जण कोरोनामुक्त झाले. 11 पैकी एका रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला आहे.

Buldana Corona update
बुलडाणा कोरोना अपडेट

By

Published : Jul 4, 2020, 10:41 AM IST

बुलडाणा -जिल्ह्यात 11 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्यापैकी शुक्रवारी 86 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 75 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 11 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या 11 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नांदुरा येथील दोन 20 वर्षीय तरुण, 62 वर्षीय पुरुष, आळसणा (ता. शेगांव) येथील 35 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 8 वर्षीय मुलगी, सती फैल खामगांव येथील 88 वर्षीय वृद्ध पुरुष, फाटकपूरा खामगांव येथील 54 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय महिला व राणी पार्क जळगांव जामोद येथील 22 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. यामधील सती फैल खामगांव येथील 88 वर्षीय वृद्ध पुरूष रुग्णाचा 2 जुलैला उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी 8 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये मलकापूर येथील 4 व धा.बढे (ता. मोताळा) येथील 4 रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवार पर्यंत 162 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या कोविड रुग्णालयात 96 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 318 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 271 वर पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाकडे 2867 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details