महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रचार खर्चावर निवडणूक आयोगाची नजर, खुर्च्याही मोजणार

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचारात लागणारी साधने, वस्तू, उपकरणे व इतर अनुषंगिक खर्चाचे दर निश्चित केले आहेत. वर्गवारीनुसार ११ परिशिष्ट तयार करण्यात आली आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय

By

Published : Apr 3, 2019, 10:01 AM IST

Updated : Apr 3, 2019, 10:36 AM IST

बुलडाणा - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून उमेदवारांच्या प्रचार खर्चावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. खर्चाचे दरपत्रक वाढल्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची दमछाक होताना पाहायला मिळत आहे. उमेदवाराचा खर्च कसा होतो ? याच्यावर आयोगाच्या कॅमेराची नजर असणार आहे.

प्रचार खर्चावर निवडणूक आयोगाची नजर

राजकारण म्हटले की खुर्च्या, हार, जेवणं आलीच. यात पैशांची वारेमाप उधळपट्टी ही ठरलेलीच. मात्र, आता चक्क निवडणूक आयोगाची नजर या सर्व वस्तूंवर असणार आहे. उमेदवाराचेजाहीर सभा, मेळावे, कार्यालय यासह प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या खुर्च्यांची मोजणीसह अन्य साहित्याची मोजणीही केली जात आहे. त्यासंबंधीची दर सूचीही प्रत्येक उमेदवाराला देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचारात लागणारी साधने, वस्तू, उपकरणे व इतर अनुषंगिक खर्चाचे दर निश्चित केले आहेत. वर्गवारीनुसार ११ परिशिष्ट तयार करण्यात आली आहेत.


परिशिष्ट एकमध्ये जेवण, नाश्ता, खाद्य पदार्थांचे दर, तर परिशिष्ट दोनमध्ये प्रचार साहित्याचे दर, भाडे; परिशिष्ट तीनमध्ये प्रती दिवस वाहनाचे भाडे; परिशिष्ट चारमध्ये हॉटेल, गेस्ट हाऊसचे प्रती दिन दर,परिशिष्ट पाचमध्ये प्रचार फलक,सहामध्ये प्रचार साहित्य,सातमध्ये हार-बुके; आठमध्ये फटाक्यांचे दर, नऊमध्ये जाहिरात प्रकाशनाचे, परिशिष्ट दहामध्ये वृत्तपत्रांचे शासकीय दर, तर ११ मध्ये हेलिपॅडचे दरहीनमूदकरण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे हा सर्व खर्च करताना आयोगाच्या व्हिडीओ शूटिंगमध्ये संपूर्ण प्रचार कैद होत असल्याने त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आणि लागणाऱ्या साहित्याची मोजदादही होत आहे. मंडप, साऊंड सिस्टीम, वाहने, सोफा, ढोलताशे यासह प्रचारासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडीओ शूटिंगच्या माध्यमातून मोजदाद केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या खर्चाचा हिशेब दररोज आयोगाला सादर करावा लागणार असून उमेदवाराने हि त्यांच्याकडे याची नोंदणी ठेवायची आहे.

Last Updated : Apr 3, 2019, 10:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details