बुलढाणा :जिल्ह्यात अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ( suicide due to infertility and indebtedness ) जिल्ह्यातील बेलूरा येथील वृद्ध दाम्पत्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या ( Elderly couple committed suicide ) केली आहे. बेलूरा ता. नांदुरा येथील सौ. सरलाबाई वसंत डामरे (वय ६५) व वसंत जगदेव डामरे (वय ७०) हे कुटूंब राहत होते. त्यांचेजवळ दोन एकर शेती असून हे कुटूंब त्यांचे अत्यल्प शेतीवर कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. ( Buldhana Crime )
Farmer Suicide News : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या - बेलूरा आत्महत्या
बुलढाण्या जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यातील बेलूरा पती-पत्नी दोघांनीही विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ह्या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या ( Elderly couple committed suicide ) केल्याचे सांगितले जात आहे. ( Buldhana Crime )
वृद्ध दाम्पत्यावर कर्जाचा बजा : या वृद्ध दाम्पत्याला ३ मुले असून दोन मुली कुटूंबासह अकोला राहतात. एक मुलगा कुटुंबासह आई - वडिलांसोबत बेलूरा येथे राहतो. सौ. सरलाबाई ह्या आजारी असल्यामुळे दवाखान्याला सुध्दा बराच खर्च झाला होता. कुटुंबात ५ ते ७ व्यक्ती व अत्यंत कमी उत्पन्न त्यामध्ये वृध्दत्व व आजारीपणामुळे या कुटुंबाकडे शेतीवर महाराष्ट्र बँक शाखा येथील कर्ज होते व इतर सुध्दा बाहेरचे खाजगी कर्ज होते. या विवंचनेतच त्या दोघांनीही सोबतच मोनोसील नावाचे विषारी औषध घेवून जीवनयात्रा संपविली. या घटनेची फिर्यादी लक्ष्मण देवराज डामरे रा. बेलुरा यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. या घटनेचा तपास अमोल खरोटे करीत आहे.
यामुळे केली आत्महत्या : सततची नापीकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी व सरपंच विनोद मेहेंगे यांनी दिली. दोघांनी सुध्दा सोबत विषारी औषध घेवूनआत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत बोराखेडी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.