महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 12, 2020, 10:03 PM IST

ETV Bharat / state

बुलडाण्यात 8 नवीन कोरोना रुग्णांची वाढ, पाच रुग्णांची कोरोनावर मात

स्वॅब नमुन्यांच्या अहवालांपैकी आज (शुक्रवार, 12 जून) 12 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 04 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

बुलडाणा कोरोना न्यूज
बुलडाणा कोरोना न्यूज

बुलडाणा - प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांच्या अहवालांपैकी आज (शुक्रवार, 12 जून) 12 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 04 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे पातुर्डा ता. संग्रामपूर येथील 64 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय मुलगा, 46 व 28 वर्षीय महिला, 5 वर्षीय मुलगी, 17 वर्षीय तरुणी आणि विठ्ठल चौक, संग्रामपूर येथील 24 वर्षीय पुरुष रुग्णांचे आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 110 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले 39 नमुने आहेत.

त्याचप्रमाणे आज बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये वावरे ले आऊट, बुलडाणा येथील 33 वर्षीय महिला, पलढग ता. मोताळा येथील 19 वर्षीय तरुणी, शेलापूर ता. मोताळा येथील 28 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय स्त्री, मुक्ताईनगर, मलकापूर येथील 40 वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे. अशाप्रकारे 5 रुग्णांना आज सुट्टी मिळाली आहे.

तसेच आतापर्यंत 1679 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 110 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 77 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 29 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 39 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1679 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details