महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात दहा दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येत घट - कोरोना रुग्णसंख्येत घट

जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. या लॉकडाऊनमध्ये कोणालाही बाहेर न निघण्याची सक्ती करण्यात आली होती. यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे. 12 मेची बाधित संख्या 5 हजार 599 घेण्यात आलेले स्वबच्या नमुन्यापैकी 1 हजार 143 नमुन्याचे अहवाल कोरोनाबाधित आले होते.

बुलडाणा कोरोना
बुलडाणा कोरोना

By

Published : May 20, 2021, 12:46 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने 10 मेपासून 20 मेपर्यंत रुग्णालये, मेडिकल वगळता जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. या लॉकडाऊनमध्ये कोणालाही बाहेर न निघण्याची सक्ती करण्यात आली होती. यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे. 12 मेची बाधित संख्या 5 हजार 599 घेण्यात आलेले स्वबच्या नमुन्यापैकी 1 हजार 143 नमुन्याचे अहवाल कोरोनाबाधित आले होते. 19 मे रोजी चाचणीसाठी घेण्यात आलेल्या 6 हजार 610 स्वबच्या नमुन्यापैकी 674 नमुन्याचे अहवाल कोरोनाबाधित आढळले आहे.

रुग्णसंख्येत अशी झाली घट

12 मे रोजीची टक्केवारीची परिस्थिती बघितली तर 5 हजार 599 चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 1 हजार 143 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याच दिवशी 1 हजार 143 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्या दिवशीचे 19.19 टक्के तर 12 मेपर्यंत 73 हजार 878 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने 15.14 टक्के इतकी टक्केवारी आली आहे. यापैकी 68 हजार 626 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयाकतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनाने 490 रुग्णांचा मृत्यू झाला असून 0.66 टक्के मृत्युजराची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम होतांना पहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details