महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! पैशासाठी दारूड्या मुलाकडून जन्मदात्या आईचा खून; आरोपी फरार - विनोद अवसारमोलकडून आपल्याच आईचा खून

मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंजनी खुर्द येथील कमलाबाई आत्माराम अवसारमोल यांना विनोद अवसारमोल व दिपक अवसारमोल दोन मुले आहेत. यातील विनोद अवसारमोल यास दारूचे व्यसन आहे.

पैशासाठी दारूड्या मुलाकडून जन्मदात्या आईचा खून

By

Published : Aug 19, 2019, 5:03 PM IST

Updated : Aug 19, 2019, 7:23 PM IST

बुलडाणा- दारूड्या मुलाने पैशासाठी वृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मेहकर येथील अंजनी खुर्द येथे घडली. रविवारी 18 ऑगस्टला संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत असलेल्या मुलाने कुऱ्हाडीचे घाव घालून आईचा खून केला. कमलाबाई आत्माराम अवसारमोल(वय ६४) असे मृत महिलेचे नाव आहे. तर विनोद अवसारमोल असे खून करणाऱ्या दारूड्या मुलाचे नाव आहे.


मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंजनी खुर्द येथील कमलाबाई आत्माराम अवसारमोल यांना विनोद अवसारमोल व दिपक अवसारमोल दोन मुले आहेत. यातील विनोद अवसारमोल यास दारूचे व्यसन आहे. रविवारी संध्याकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान विनोद अवसारमोल याने आईला पैसे मागितले. मात्र आईने दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग येऊन त्याने आईवर कुऱ्हाडीने वार केले. यात कमलाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मेहकर पोलीस स्टेशनला त्यांचा मोठा मुलगा दिपक आत्माराम अवसारमोल याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मुलगा विनोद आत्माराम अवसारमोल(वय 40) विरुद्ध कलम 302 व 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पुढील तपास ठाणेदार आत्माराम प्रधान करत आहेत.

Last Updated : Aug 19, 2019, 7:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details