महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेगाव शहरातील पाणी दूषित; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - शेगाव

मलनि:स्सारणाची पाईपलाईन अनेक जागी लिकेज असल्यामुळे भूगर्भातील पाणी दूषित झाले असून बोअरवेलद्वारे येणारे पाणी दूषित असल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे.

दूषित पाणी

By

Published : Mar 18, 2019, 1:17 PM IST

बुलडाणा - शेगाव शहरात विकास आराखड्या अंतर्गत भूमिगत गटार योजना कार्यान्वयीत करण्यात आली आहे. या योजनेतील मलनि:स्सारणाची पाईपलाईन अनेक जागी लिकेज असल्यामुळे भूगर्भातील पाणी दूषित झाले असून बोअरवेलद्वारे येणारे पाणी दूषित असल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दूषित पाणी

शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या एका चमूने दिवसभर शहरातील संपुर्ण भूमिगत योजनेची तपासणी केली. अनेक ठिकाणच्या बोअरचे सॅम्पल तपासणीसाठी सोबत नेले आहेत. या टिममध्ये वैज्ञानिकांचाही समावेश होता. पाणी दूषित झाल्यासंदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आणल्याने ही कारवाई झाली.


बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात भूमिगत गटार योजनेची कामे निकृष्ठ दर्जाची झाल्याच्या तक्रारी आधीपासूनच आहेत. याबाबत शहरातील सुरेश जैपुरीया यांनी एनजीटी (नॅशनल ग्रिन ट्रिब्युनल) या न्यायसभेकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन शासकिय पृथक्करण विभागाने शहरातील पाण्याचे नमुने तपासणीकरीता नेले. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली होती.

या समितीच्या अहवालानुसार शहरातील बोअरचे पाणी दूषित झाले असून ते पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल देण्यात आल्याची माहिती तक्रारकर्ते जैपुरीया यांनी दिली आहे. त्यांनी सदर अहवाल एनजीटीपुढे ठेवल्यानंतर एनजीटीकडून ३ तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली. त्या समितीमध्ये जलप्रदूषण विभाग मुंबईचे सहाय्यक संचालक डॉ. वाय. बी. सोनटक्के, वायुप्रदूषण विभाग मुंबईचे सहाय्यक डॉ. व्ही. एम. मोरघरे, नाशिक येथील वैज्ञानिक डॉ. खडकीकर यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत प्रादेशिक विभाग अकोलाचे क्षेत्र अधिकारी जितेंद्र पुरते, उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी प्रशांत मेहरे यांचीही उपस्थिती होती.

शनिवारी सकाळी या समितीकडून शहरात टाकण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेची पाहणी करण्यात आली. यामध्ये या समितीकडून विविध ठिकाणी ओव्हरफ्लो होत असलेली पाईलाईन, ब्लॉकेज व चार विविध ठिकाणच्या बोअरचे सँपल घेण्यात आले. सदर सॅम्पल तक्रारकर्त्यांच्या समक्ष व सहिने सिलबंद करण्यात आले असून सॅम्पलची तपासणी केल्यानंतर अहवाल एनजीटीला पाठविण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details