महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासगी कोविड रुग्णालयाची देयके तहसिलदारांनी तपासल्याशिवाय रुग्णांनी देऊ नयेत - शिंगणे - बुलडाणा कोरोना अपडेट

खासगी कोविड रुग्णालयाची देयके तहसिलदारांकडून तपासणी केल्याशिवाय रुग्णांनी अदा करू नयेत असे आवाहन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन बैठकीत ते बोलत होते.

Dr. Rajendra Shingane has appealed to the patients not to pay the bill of private Covid Hospital without checking by the Tehsildar.
खासगी कोविड रुग्णालयाचे देयके तहसिलदारांकडून तपासणी केल्याशिवाय रुग्णांनी अदा करू नयेत - डॉ राजेंद्र शिंगणे

By

Published : Apr 7, 2021, 10:52 PM IST

बुलडाणा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच शासकीय कोविड रुग्णालयासह खाजगी कोविड रुग्णालयात रुग्णांनी भरलेली असून बेड मिळेनासे झाले आहे. अशा वेळेस खासगी कोविड रुग्णालयाकडून रुग्णांकडून अवाजवी बिल वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयामध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांनी रुग्णालयाकडून देण्यात आलेली देयके आधी स्थानिक तहसीलदारांकडून तपासणी करून घ्यावीत आणि नंतरच तहसीलदाराच्या म्हणण्यानुसार देयके अदा करावीत असे आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी रुग्णांना केले आले आहे.

कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन मंगळवारी 6 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होते. याप्रसंगी बैठकीत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके आदी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रुग्णांकडून देयके वसूल करण्यासंदर्भात खासगी कोविड रुग्णालयाकरता जारी आहे एक अध्यादेश -

बुलडाणा जिल्ह्यात एकूण 23 खासगी कोविड सेंटर कार्यरत असून या रुग्णालयांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व कोरोना संशयित रुग्ण उपचार करून घेत आहेत. 10 ते 15 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णांकडून लाखो रुपयांचे देयके वसूल करण्यात येत असल्याच्या तोंडी तक्रारी वाढल्या असून या खाजगी कोविड रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार घेणे अडचणीचे जात असल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर पालकमंत्री डॉ शिगणेंनी आपल्या उत्तरात सांगितले की, यापूर्वीच शासनाने खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून देयके वसूल करण्यासंदर्भात एक अध्यादेश जारी केला असून त्या अध्यादेशात ठरवून दिल्यानुसार खासगी रुग्णालयांनी देयके घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे खाजगी कोविड रुग्णालयाकडून देण्यात येणारे देयके प्रथम स्थानिक तहसीलदार यांच्याजवळ नियमाप्रमाणे दिले गेले आहे किंवा नाही याची तपासणी करून घ्यावी व नंतर तहसीलदारांनी सागीतल्यानंतरच खासगी कोविड रुग्णालयांना देयक अदा करावे, अशी सूचना आम्ही अगोदरच दिलेली आहे. जर सूचनांची अंमलबजावणी होत नसेल तर ताबडतोबीने संबंधीत तहसलीदारांना तशा सूचना देण्यात येतील. रुग्णांनी सुद्धा तहसीलदारांना देयके दाखवल्या शिवाय अदा करू नये असे आवाहन डॉ.शिगणेंनी जनतेला केले.

ABOUT THE AUTHOR

...view details