महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलगा व्हावा म्हणून सुनेकडे शारीरिक सुखाची मागणी, सासऱ्यासह कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल - violence

सुनेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबातील ६ जणांवर बलात्कारासह विविध कल्मान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jun 14, 2019, 7:26 PM IST

बुलडाणा- सुनेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मानसिक त्रास आणि पैशाची मागणी केल्याप्रकरणी कुटुंबातील ६ जणांवर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी कामडे,पोलीस निरीक्षक बुलडाणा आणि डॉ.प्रेमचंद पंडित,जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

बुलडाण्यातील २७ वर्षीय विवाहितेचे लग्न औरंगाबाद येथील जयश जैस्वाल याच्यासोबत सन २०१२ मध्ये झाले होते. पीडितेला जयश जैस्वालकडून २०१४ ला मुलगी झाली होती. त्यानंतर विवाहितेला गर्भधारण झाली नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास देण्यात येत होता. तसेच माहेरकडून १० लाख रुपये आणण्यासाठी त्रास देण्यात येत होता. सासरा आनंद जैस्वाल हे विवाहितेवर चुकीची नजर ठेवत होते. त्यांनी सुनेला मुलगा होण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.

सासरे त्रास देत असल्याची कल्पना पती जयश जैसवाल यांना दिल्यानंतर उलट विवाहितेला मारहाण करण्यात आली. तिचे सासरे आनंद जैस्वाल सुनेला फोन करुनही त्रास देत होते. या कृत्यासाठी सासू किरण जैस्वाल, ननंद श्रद्धा जैस्वाल, स्मिता जैस्वाल आणि अतिष जैस्वाल यांनी सासऱ्यांना मदत केल्याची तक्रार विवाहितेने बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

आरोपींवर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सासरा आनंद जैस्वाल आणि पती जयश जैस्वाल यांना पोलिसांनी बुधवारी ५ जून रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता या दोघांना १० जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.

यानंतर १० जूनला न्यायालयासमोर हजर केले असता आणि पोलिसांनी मोबाईल संभाषण पडताळुन पाहण्याकरीता आरोपींनी आणखी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. तसेच प्रकृतीच्या कारणावरुन आरोपींना कैदी वार्डात भरती करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details