महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्या निषेधार्थ बुलडाण्यात डॉक्टरांचे आंदोलन - IMA Doctors Association Movement

कोरोना काळात संपूर्ण देशात डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत आहेत, ज्यामध्ये अनेक डॉक्टरांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यांना शासनाकडून पाहिजे ती मदत देखील करण्यात आली नाही. आणि दुसरीकडे अनेक डॉक्टरांवर वेगवेगळे आरोप करून त्यांच्यावर हल्ले करण्यात येत आहेत.

बुलडाण्यात डॉक्टरांचे आंदोलन
बुलडाण्यात डॉक्टरांचे आंदोलन

By

Published : Jun 19, 2021, 4:54 AM IST

Updated : Jun 19, 2021, 10:22 AM IST

बुलडाणा - संपूर्ण देशभर डॉक्टरांवर होत असलेल्या विविध प्रकारच्या हल्ल्यां विरोधात आणि ॲलोपॅथी उपचार तर व्हॅक्सिनेशन विरोधातील वक्तव्यांच्या विरोधात निषेधार्थ शुक्रवारी 18 जून रोजी संपूर्ण देशभर आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने काळ्या फीती, काळे मास्क अथवा काळया फिती लावून आपला निषेध व्यक्त करत आंदोलन केली. या आंदोलनात हल्ले करणाऱ्यांवर ताडा कायदा लावण्यात यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदविला व यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्या निषेधार्थ बुलडाण्यात डॉक्टरांचे आंदोलन
डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना शिक्षा करण्यात यावीकोरोना काळात संपूर्ण देशात डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत आहेत. ज्यामध्ये अनेक डॉक्टरांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यांना शासनाकडून हवी ती मदत देखील करण्यात आली नाही. आणि दुसरीकडे अनेक डॉक्टरांवर वेगवेगळे आरोप करून त्यांच्यावर हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे हे हल्ले थांबवण्यासाठी शासनाने डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कायदा करावा. ज्यामध्ये 25 ते 30 वर्षांची शिक्षा असायला हवी. किंवा त्यांच्यावर ताडा कायदा लावायला पाहिजे व कारवाई करावी. अशी मागणी जिल्हाधिकारी एस.रामामुर्थी यांच्याकडे करण्यात आली आहे. या आंदोलनात शुक्रवारी जिल्ह्यातील आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेच्या डॉक्टरांनी आपल्या तोंडाला काळे मास्क आणि काळया फिती लावून रुग्णांची तपासणी व उपचार केले.
Last Updated : Jun 19, 2021, 10:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details