बुलडाणा : Doctor Looted Case : डॉक्टरच्या एका ओळखीच्या व्यक्तीचाही यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणात सावध पावले उचलत सात पैकी पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात स्वतः ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी सूत्र हाती घेत याचा छडा लावला आहे.
डॉक्टरला मारहाण आणि चित्रफीतही काढली : बुलडाण्यातील एका डॉक्टरला फोनवरून रुग्णाला पाहण्यासाठी बोलवण्याचा बहाणा करण्यात आला. डॉक्टर घटनास्थळी तपासणी करण्यासाठी पोहोचल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली व चित्रफितसुद्धा काढण्यात आली. त्यानंतर बदनामीचा धाक दाखवत त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रेस करत पाच जणांना संभाजीनगर येथून अटक केली आहे. त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत.
मोबाईल लोकेशनच्या आधारे 'या' आरोपींना केली अटक : या गुन्ह्यात अजय नंदकुमार नागपुरे (वय 30 वर्षे, रा. बुलडाणा) यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले; परंतु तोपर्यंत बातमी प्रसारीत झाल्याने दीक्षांत ब्रम्हचारी नवघरे (वय 23 वर्ष, रा. जुनागांव वा. नं. 10 बुलडाणा), विशाल मनोहर गायकवाड (वय 24 वर्षे, रा. पोलीसमित्र वसाहत, चिखली रोड, बुलडाणा), आदेश सुनिल राठोड (वय 19 वर्षे, रा. क्रीडा संकुल रोड, बुलडाणा), सुरज मोतीराम पसरटे (वय 20 वर्षे, रा. तारकॉलनी, बुलडाणा) यांच्या अटकेची बुलडाणा पोलिसांनी रात्रीच मोहिम हाती घेतली. या आरोपींना त्यांच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे ट्रेस करून मोठ्या शिताफीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निपानी आडगांव शिवारातून अटक करण्यात आली आहे.