बुलडाणा- जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी व परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. यामुळे शेतकरी बांधवाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विमा काढलेल्या पिकांची व विमा न काढलेल्या पिकांसाठी करण्यात येत असलेले पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करा. तसेच कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे निर्देश कृषि, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी शनिवारी दिले.
बुलडाणा : खरीप पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून सरकारला अहवाल सादर करण्याचे जलसंधारण सचिवांचे आदेश - बुलडाणा अवकाळी पाऊस
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी व परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. यामुळे शेतकरी बांधवाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विमा काढलेल्या पिकांची व विमा न काढलेल्या पिकांसाठी करण्यात येत असलेले पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करा, असे आदेश कृषि, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी दिले.
बुलडाण्यात खरीप पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करा- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीक नुकसान पंचनाम्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. लहाने आदी उपस्थित होते.
Last Updated : Nov 10, 2019, 8:09 PM IST