महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'वसा आरोग्याचा' अंतर्गत महिलांना 'सॅनेटरी नॅपकीन'चे वाटप - सॅनेटरी नॅपकीनचे वाटप बुलडाणा बातमी

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यभरात 'वसा आरोग्याचा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील शेगावात हळदी-कुंकू, तिळगूळा सोबत प्रत्येक महिलेला दोन 'सॅनिटरी नॅपकीन'ही वाण म्हणून देण्यात आले आहे.

महिलांना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप
महिलांना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप

By

Published : Feb 3, 2020, 12:24 PM IST

बुलडाणा -मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात. जिल्ह्यातील शेगावात हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. हळदी-कुंकू, तिळगूळा सोबत प्रत्येक महिलेला दोन 'सॅनिटरी नॅपकीन'ही वाण म्हणून देण्यात आले आहे. तसेच महिलांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आली आहे.

'वसा आरोग्याचा' अंतर्गत महिलांना 'सॅनेटरी नॅपकीन'चे वाटप

हेही वाचा-'आम्हांला जनतेचे अपार समर्थन; दिल्लीकरांचं ठरलंय!'

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यभरात 'वसा आरोग्याचा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्रदेश सचिव नंदा पाऊलझगडे यांच्या वतीने शेगाव येथील 'श्री स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल' याठिकाणी शनिवारी 'हळदी कुंकवा'चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात १ हजारांच्यावर महिलांना हळदी कुंकू लावून, त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच तिळगूळासोबत प्रत्येकी दोन सॅनिटरी नॅपकीन वाण म्हणून देण्यात आले. सॅनेटरी नॅपकीनचा वापर आणि विल्हेवाट कशी करावी याबाबत जनजागृतीपर माहितीपत्रकही यावेळी महिलांना देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details