महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिव्यांगांवरील अत्याचाराविरोधात बुलडाण्यात धरणे आंदोलन

खेर्डा आणि खामगाव या गावात लागोपाठ दिव्यांगांवर अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर 'दिव्यांग शक्ती' संघटनेच्यावतीने गुरुवारी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाला बुलडाण्यातील विविध संघटनांनी पाठींबा दर्शविला. यावेळी जिल्हाभरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

disable-persons-agitation-at-buldana
दिव्यांगांवरील अत्याचाराविरोधात बुलडाण्यात धरणे आंदोलन

By

Published : Dec 12, 2019, 4:55 PM IST

बुलडाणा -खेर्डा आणि खामगाव या गावात लागोपाठ दिव्यांगांवर अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर 'दिव्यांग शक्ती' संघटनेच्यावतीने गुरुवारी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाला बुलडाण्यातील विविध संघटनांनी पाठींबा दर्शविला. यावेळी जिल्हाभरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिव्यांगांवरील अत्याचाराविरोधात बुलडाण्यात धरणे आंदोलन

हेही वाचा - अयोध्या प्रकरण : फेरविचार याचिकांवर आज सुनावणी

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील 50 वर्षीय दिव्यांग महिलेवरील अत्याचार करून हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच खामगाव शहराजवळील घाटपुरी येथे मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या एका अल्पवयीन मतिमंद बालिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्ह्यातील या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आज (गुरुवारी) 'दिव्यांग शक्ती' संघटनेच्यावतीने खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात मनोज नगरनाईक, मिलिंद मधुपवार, शकील मलंग, अनुराधा सोळंकी, विनोद डिडवानी, अमोल भोलनकर, संजय घेंगे, रूख्मीना वाघ, अभिषेक निकाळे, शिवा जाधव, मथुरा वानखडे, सोनोने, मिलिंद वारे, श्रीराम बोचरे, ऋतुराज गवई, राजेश तेलंग, विजय महल्ले, गणेश काळे आदी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाला खामगाव प्रेस क्लबच्यावतीने किशोरअप्पा भोसले, योगेश हजारे, शरद देशमुख यांनी पाठींबा दर्शविला. त्याचप्रमाणे रुद्र अपंग संघटना आणि प्रहार अपंग संघटनेच्यावतीनेही आंदोलनाला पाठींबा देण्यात आला.

हेही वाचा - ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार 16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details