बुलडाणा - गाय मांसाहारही करते म्हटले तर? विश्वास बसत नाही ना? मात्र, हे खरे आहे. नांदुरा तालुक्यातील मांसाहारी गाईचे अजब वास्तव समोर आले आहे. टाकरखेड येथील एक गाय चक्क कोंबडीचे मांस खात असल्याची घटना समोर आली आहे.
अजब वास्तव; बुलडाण्यात गाय बनली मांसाहारी
या गायीने ४ दिवसांपूर्वी कोंबडी खाल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. टाकरखेडचे शेतकरी बारस लोनाग्रे यांची ही पाळीव गायीने चक्क दोनवेळा कोंबड्या खाल्ल्याचे गावकऱ्यांनी बघितले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले. खरंच गाय मांस खाऊ शकते का? हे जाणून घेण्यासाठी टाकरखेड येथे गेले असता तेथील गावकरीही म्हणाले, की गायीने मांसाहार करताना आम्ही पाहिले आहे.

यावरून पाहणी झाली असता, या विषयी तज्ज्ञांचे काय मत आहे? खरंच शाकाहारी प्राणी मांसाहार करू शकतो का? हे जाणून घेण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. वैशाली उईके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की वैज्ञानिकच्या दृष्टीकोनातून हे शक्य नाही, पण एखादी घटना घडू शकते. जास्त भूक लागल्यामुळे गायीने मांस खाल्ले असेल असे त्यांनी सांगितले.