बुलडाणा - तीन फेब्रुवारीला खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा पार पडली होती. दरम्यान, यातील विविध वादग्रस्त ठरावांच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांनीं सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत जात चौकशी केली. या चौकशीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात विरोधी सदस्यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात चार फेब्रुवारीला बुलडाणा येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर सभेच्या कामकाजांची चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते.
त्यानुसार खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन फेब्रुवारीला पार पडलेली सर्वसाधारण सभा ही नियमबाह्य होती. या सभेतील विषय सुचीवर महाराष्ट्र शेतीच्या उत्पन्नाची खरेदी-विक्री (नियमन व विकसन) १९६७ चे नियम १०८ (२) नुसार सह्यांचे अधिकार प्रदानकरणेबाबत हा विषय होता. या विषयाच्या बाजूने मतदानाची उपसभापती निलेश दीपके, संचालक श्रीकृष्ण टिकार, संजय झुनझुनवाला, विवेक मोहता, राजेश हेलोडे यांनी मागणी केली. त्यावेळी सभापती सभेतून निघून गेले होते. सभानियमांचा भंग केल्याप्रकरणी सभापती व सचिव यांची तातडीने सक्षम अधिकाऱयामार्फत समयबद्ध कालावधीमध्ये चौकशी व्हावी, अशी मागणी बाजार समितीचे उपसभापती निलेश दीपके, संचालक श्रीकृष्ण टिकार, संजय झुनझुनवाला, विवेक मोहता, राजेश हेलोडे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली होती. त्यानुसार सोमवारी जिल्हा उपनिबंधक महेश चव्हाण यांच्याकडून चौकशी करण्यात आली.
माहिती देण्यास नकार -