बुलडाणा - रिझर्व्ह बँकेकडून मलकापूर अर्बन बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधाचा असर मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहण्यास मिळाला. शुक्रवारी 26 नोव्हेंबर रोजी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. कारण समितीमधील कार्यरत 90 टक्के व्यापाऱ्यांची खाते मलकापूर अर्बन बँकेमध्ये असल्याने बँकेतून 10 हजार रुपये पेक्षा जास्त पैसे काढणे बंद झाल्याने व्यापारी शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊ शकत नाही.
Malkapur urban bank : मलकापूर बाजार समिती बंद ठेवण्याचा घेतला निर्णय - रिझर्व्ह बँक
मलकापूर अर्बन बँकेवर 24 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहे. मलकापूर अर्बन बँकेला याआधी केवायसी अनियमितताबद्दल दोन लाखांचा दंड झाला आहे. परिणामी, व्यापाऱ्यांचे पैसे थकले आहेत.
या सर्व व्यापाऱ्यांचा पैसा मलकापूर अर्बन बँकेत अडकल्याने बाजार समितीमध्ये व्यवहार करता येत नाही. म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी बाजार समिती बंद ठेवण्यात यावी अशी विनंती केली. 30 नोव्हेंबरपर्यंत मलकापूर बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीच्या वतीने घेतला आहे, या दरम्यान शेतकऱ्यांचा शेतमाल पडून राहणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
मलकापूर अर्बन बँकेवर निर्बंध
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे भाजपचे नेते मुख्यालय असलेल्या मलकापूर अर्बन बँकेवर 24 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहे. जिल्ह्यासह खानदेश , मराठवाडा भागात प्रस्थ असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. मलकापूर अर्बन बँकेला याआधी केवायसी अनियमितताबद्दल दोन लाखांचा दंड झाला आहे. याआधी 2008 साली बँकेवर स्थानिक ग्राहकाने रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.