महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुतात्मा जवान नितीन राठोड यांच्या चोरपांग्रा गावाचे नाव वीरपांग्रा करण्याचा निर्णय

हुतात्मा जवानाच्या स्मृती कायम राहाव्या, यासाठी गावाचे नाव बदलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. २६ फेब्रुवारीला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तलाठी विनायक पाटील यांनी ग्रामसभेत बोलताना गावाचे नाव बदलण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असल्याचे सांगितले. गावाचे नाव बदलावे आणि चोरपांग्रा ऐवजी वीरपांग्रा असे नामकरण करावे, अशा गावकऱ्यांच्या भावना असल्याचे त्यांनी सांगितले. या ग्रामसभेत याच विषयावर सर्वांचे मत घेऊन चर्चा करण्यात आली.

गावात लागलेले फलक

By

Published : Mar 1, 2019, 7:17 PM IST

बुलडाणा- हुतात्मा जवान नितीन राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावकऱ्यांनी चोरपांग्रा नावात बदल करून वीरपांग्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीला विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी तसा ठराव मंजुर केला आहे. तेव्हापासून गावाला वीरपांग्रा नावाने संबोधण्यात येत आहे. चोरपांग्राचे नाव महसुली नकाशावर वीरपांग्रा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक नितीन सौदर यांनी सांगितले आहे.

संबंधित व्हिडीओ

पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात जिल्ह्यातील २ जवानांना वीरमरण आले होते. त्यामध्ये मलकापूर येथील संजय राजपूत व लोणार तालुक्यातील चोरपांग्रा(गोवर्धन नगर) येथील वीर जवान नितीन राठोड यांचा समावेश होता. चोरपांग्रा गावासह संपूर्ण जिल्ह्यावर या घटनेने शोककळा पसरली होती. या हुतात्मा जवानाच्या स्मृती कायम राहाव्या, यासाठी गावाचे नाव बदलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. २६ फेब्रुवारीला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तलाठी विनायक पाटील यांनी ग्रामसभेत बोलताना गावाचे नाव बदलण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असल्याचे सांगितले. गावाचे नाव बदलावे आणि चोरपांग्रा ऐवजी वीरपांग्रा असे नामकरण करावे, अशा गावकऱ्यांच्या भावना असल्याचे त्यांनी सांगितले. या ग्रामसभेत याच विषयावर सर्वांचे मत घेऊन चर्चा करण्यात आली.

दरम्यान, सर्वांच्या भावना पाहता नामकरणाचा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला. या ठरावाला उपस्थित सर्व गावकऱ्यांनी सहमती दिल्याने गावाचे नाव बदलण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. या सभेला सरपंच विठ्ठल चव्हाण, संजय चव्हाण, मधुसूदन डहालके आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details