बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव ते जलंब या मार्गावर अवैध रेती वाहणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. ललिता सुपडा जाणे (वय 52 गाडेगाव बु.ता.जळगाव जामोद) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
बुलडाण्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने महिलेला चिरडले - धडक
जिल्ह्यातील खामगाव ते जलंब या मार्गावर अवैध रेती वाहणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली.
बुलडाण्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने महिलेला चिरडले
या टिप्परने दुचाकीला धडक दिल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने या टिप्परला आग लावली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परस्थिती नियंत्रणात आणली.