महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जांभरुन गावानजिकच्या सार्वजनिक विहिरीत आढळला 51 वर्षीय इसमाचा मृतदेह - जांभरुन न्यूज

शहराला लागून असलेल्या जांभरुन गावानजिकच्या एका विहीरीत 51 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतकाने आत्महत्या केली की, तो चुकून विहरीत पडला, हे अस्पष्ट असून पोलीस याचा तपास करीत आहे.

 बुलडाणा
बुलडाणा

By

Published : Jul 15, 2020, 7:38 AM IST

बुलडाणा -शहराला लागून असलेल्या जांभरुन गावानजिकच्या एका विहीरीत 51 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. मृतकाचे नाव भुजंगराव साळूबा वाघमारे असे आहे. मृतकाने आत्महत्या केली की, तो चुकून विहरीत पडला, हे अस्पष्ट असून पोलीस याचा तपास करीत आहे.

जांभरून शिवारात आपल्या बहिणीकडे राहणारे भुजंगराव साळूबा वाघमारे हे सोमवारी सकाळी घराबाहरे पडले. काही तासानंतर गावाजवळच्या सार्वजनिक विहीरीत त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

पोलिसांनी पंचनामा करुन बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतकाने आत्महत्या केली की, त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली हे अस्पष्ट असून पोलीस याचा तपास करीत आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. मृतकाचा मुलगा व मुलगी औरंगाबादला राहतात तर त्यांना पत्नी नसून ते आपल्या बहिणीकडे जांभरुन गावात राहत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details