बुलडाणा- अचानक झालेल्या हवामान बदलाने जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव, शेगाव, मलकापूर तालुक्यात मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुलडाण्यात अवकाळी पावसासह गारपीट... पिकांचे नुकसान - अवकाळी पाऊस बातमी
माकोडी परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तर खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, शेंबा येथील पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे गहू, हरभरा, मिरची आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
बुलडाण्यात अवकाळी पावसासह गारपीट...
मोताळा तालुक्यातील माकोडी परिसरात शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तर खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, शेंबा येथील पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे गहू, हरभरा, मिरची आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झाला आहे.