महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 23, 2021, 7:23 PM IST

Updated : May 24, 2021, 12:49 PM IST

ETV Bharat / state

रुग्णालयाने गहाण ठेवणे चक्क मंगळसुत्र, VIDEO झाला व्हायरल

कोरोना महामारीत माणुसकी हरवल्याचे चित्र दिसत आहे. असाच एक संतापजनक खामगावमध्ये अश्विनी कोविड केअर सेंटरमधून उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आला आहे.

धक्कादायक
धक्कादायक

बुलडाणा -कोरोनावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देताना नातेवाईकांकडे बिलाची पूर्ण रक्कम नसल्याने रुग्णाच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रच रुग्णालयाने गहाण ठेऊन घेतल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयाने मात्र याविषयी काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर रुग्णाच्या नातेवाईकांनी मात्र रुग्णालयावर मंगळसूत्र ठेऊन घेतल्याचा आरोप लावला आहे. खामगावमध्ये अश्विनी कोविड केअर सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे.

धक्कादायक! थकबाकीच्या वसुलीसाठी पतीच्या सुट्टीसाठी ठेवून घेतले पत्नीचे मंगळसूत्र!

व्हायरल व्हिडिओमुळे प्रकार समोर

याविषयी नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, सिटीस्कॅनच्या रिपोर्टवरुन कोरोना रुग्णाचे 9 दिवस खासगी कोविड रुग्णालयात उपचार केलेल्या रुग्णाकडे सुट्टी घेतानाच्या दिवशी बिलामधील 11 हजार रुपये कमी पडले. यावेळी रुग्णाला पूर्ण पैसे भरल्याशिवाय सुट्टी न देण्याचा पवित्रा घेत रुग्णाच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवत सुट्टी देण्याचा धक्कादायक प्रकार अश्विनी कोविड केअर सेंटरमध्ये घडला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळसूत्र सोडविण्यासाठी गेलेल्या रुग्णांकडून बिलामधील उर्वरित राहिलेले 11 हजार रुपये न घेता, गहाण ठेवलेले मंगळसूत्र रुग्णालय प्रशासनाने परत दिल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.

कोरोना निगेटिव्ह असताना सिटीस्कॅनद्वारे केला उपचार
खामगाव शहरातील चार ते पाच डॉक्टरांनी आश्विनी कोविड केअर सेंटर रुग्णालय भाड्याने घेऊन सुरू केले आहे. या खासगी कोविड सेंटरमध्ये 13 मे रोजी आवार गावातील मंगेश गवई नावाचा तरुण सर्दी, ताप या आजारावर उपचारासाठी आला असता डॉ. पंकज मंत्री यांनी त्याला सिटीस्कॅन करायला सांगितला. पण सोबत पैसे नसल्याने हा रुग्ण आपल्या गावी परत गेला. नंतर त्याने जवळ असलेल्या अटाळी येथील आरोग्य केंद्रात जाऊन कोविड टेस्ट करून घेतली. ती निगेटिव्ह आली. त्यामुळे आपण कोरोनाबाधित नसल्याची खात्री झाल्यावर आपल्याला ताप येतो म्हणून सिटीस्कॅन करूनच घेऊ, असे ठरवून त्यांनी ती टेस्ट केली व परत डॉ. मंत्री यांना रिपोर्ट दाखविला. यानंतर त्यांनी आरटीपीसीर टेस्ट न करताच, तुम्हाला कोरोनाची लक्षणे असून तुम्ही आमच्या कोविड सेंटरला भरती व्हा, असा सल्ला दिल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. यानंतर उपचारांसाठी रुग्णाने घरात असलेली 45 हजारांची घेतलेली बैलजोडी फक्त 38 हजार रूपयाला विकली व पैशांची जुळवाजुळव करून रुग्ण भरती झाला, अशी माहिती , रुग्णाचे भाऊ चंद्रपाल गवई यांनी दिली आहे.

'व्हायरल व्हिडिओबाबत काहीच माहीत नाही'
याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता आम्हाला या व्हायरल व्हिडिओबाबत काहीच माहीत नसल्याचे कोविड सेंटरचे संचालक डॉ. सम्राट मानकर व डॉ. गौरव गोयंका यांनी सांगितले. रुग्ण कोरोनाबाधित नसताना देखील त्यांनी या रुग्णावर कोविड सेंटरमध्ये उपचार केले असे विचारले असता रुग्ण कोविड पॉझिटिव्ह होता असे त्यांनी सांगितले.

'जिल्हा प्रशासनाचे कुठेही लक्ष नसल्याचे स्पष्ट'
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात असे प्रकार घडत असल्याने आता जिल्हा प्रशासनाचे कुठेही लक्ष नसल्याचा आरोप होताना दिसत आहे. याबाबतीत काही समाजसेवक व रुग्णाचे नातेवाईक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Last Updated : May 24, 2021, 12:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details